नगर:  शिवसैनिक हत्येनंतर झालेल्या आंदोलनांप्रकरणी 600 शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

अहमदनगरमधील शिवसैनिक हत्येनंतर झालेल्या आंदोलनांप्रकरणी 600 शिवसैनिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. दगडफेक, रास्ता रोको प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी शिवसैनिकांकडून अहमदनगरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. शनिवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सुरु असलेली पोलिसांचा तपास आणि अटकसत्र अजूनही सुरू आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तब्बल 600 शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live