अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

राज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली. बाईकवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली आहे. एसआरएच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात शिवसेना नेत्यांचं हत्यासत्र सुरूच आहे. अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईत शिवसेना नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली. बाईकवरुन आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून ही हत्या केली आहे. एसआरएच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. गोळीबारानंतर जखमी सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांच्यावर 2009 मध्ये देखील अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. 


संबंधित बातम्या

Saam TV Live