दीड हजार ते अठराशे शिवसेना पदाधिकारी विशेष गाडीने  अयोध्येत रवाना होणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नाशिक - ‘हर हिंदू की यही पूकार, पहले मंदिर फिर सरकार’, असा नारा देणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेचा भरवसा ‘रामभूमी’ अर्थात, नाशिकवर असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी (ता. २२) रात्री नाशिक रोड रेल्वेस्थानकातून विशेष रेल्वेगाडी अयोध्येसाठी रवाना होईल. त्यामधून दीड हजार ते अठराशे पदाधिकारी प्रवासाला सुरवात करतील. 

श्री. ठाकरे शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) असे दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर असतील. ‘जय महाराष्ट्र’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने राममंदिराच्या प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख शरयू नदीकाठी महाआरती करतील. त्यानंतर संत-साधू-महंतांच्या भेटी घेतील. रविवारी (ता. २५) रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांची सभाही होईल. शिवसेनेने पक्षप्रमुखांच्या या महत्त्वाकांक्षी भूमिकेच्या अनुषंगाने अयोध्येतील गर्दीसाठी नाशिकवर लक्ष केंद्रित केले. राज्य, केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारबरोबर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी शिवसेनेने आपल्या स्टाइलनुसार गर्दीचे नियोजन केले आहे

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येमधील दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून पदाधिकाऱ्यांच्या जोडीला साडेतीन ते चार हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील. कार्यकर्त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी प्रमुख पदाधिकारी रेल्वेने प्रवास करणार आहेत.
- विजय करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख, नाशिक

संबंधित बातम्या

Saam TV Live