शिवसेनेचा मराठा मोर्चाला पाठिंबा पण बंदमध्ये सहभाग नाही 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

राजकीय इतिहासात कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनात तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने या वेळी मात्र धोरणात बदल केल्याचे चित्र आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे. 

लोकसभेतही आज शिवसेनेच्या खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला. खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत मराठा समाजाच्या उद्रेकाबाबत सविस्तर माहिती देत मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी केली, तर राज्य सरकार मराठा आरक्षणात वेळकाढूपणा करत असल्यानेच मराठा समाजात उद्रेक झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आजपर्यंत शिवसेना सामाजिक आरक्षणाच्या कोणत्याही आंदोलनात राजकीय पक्ष म्हणून सहभागी होत नव्हती. आरक्षण हा विषय शिवसेनेच्या अजेंड्यावर कधीही नव्हता. त्यामुळे, आता मराठा आरक्षणाला समर्थन देत शिवसेनेचे आरक्षणाचं धोरण बदलल्याचे मानले जात आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी ‘सामना’मध्ये वादग्रस्त व्यंग्यचित्र रेखाटल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली होती. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live