राज्यात मुख्यमंत्रीबदल होईल; मराठा आंदोलन हिंसक झाल्याबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 जुलै 2018

राज्यात हिंसा होते तेव्हा मुख्यमंत्री बदलतो असे म्हणत शिवसेनेने नेतृत्वबदलाबाबत भाकीत केले आहे. 
राज्यात मुख्यमंत्रीबदल होईल असे भाकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

राज्यात मराठा आंदोलन पेटलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र गप्प आहेत. हे राज्याच्या नेतृत्वाचे अपयश आहे, अशी खंत व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे. असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

राज्यभरात मराठा आरक्षणाचा अागडोंब उसळला आहे. त्यातच मंत्री व मुख्यमंत्री यांच्या सुरवातीच्या वक्तव्याने मराठा युवक अधिकच भडकले असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना निवेदन दिले आहे. या निवेदनातल्या भूमिका योग्य असल्याचे राऊत म्हणाले. पण राज्य जळत असताना राज्याच्या नेतृत्वानं बंद दरवाजा आड बसणे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही हे राजकिय अपयश आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्र सोडले आहे. मराठा आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live