मातोश्रीवरील बैठकीत आज शिवसेनेची भूमिका ठरणार?

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सत्ता स्थापनेबाबत आमदारांचा कल उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. या बैठकीत सत्तेत समसमान वाटा मिळावा हीच भूमिका शिवसेना आमदारांकडून मांडली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यताय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग आलाय. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या.

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सत्ता स्थापनेबाबत आमदारांचा कल उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत. या बैठकीत सत्तेत समसमान वाटा मिळावा हीच भूमिका शिवसेना आमदारांकडून मांडली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यताय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींनी वेग आलाय. या निवडणुकीत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सत्तास्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.  गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या असल्याने यंदाच्या सत्तेत शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमीका घेते आणि त्यावर भाजप कशी कृती करते याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. ही बैठक लक्षवेधी ठरणार हेच यावरुन दिसतंय.

Web Title - shivsena meeting on matoshree on election result.


संबंधित बातम्या

Saam TV Live