शिवसेना आमदारांची संख्या आता 56 वरुन 64 वर, या आमदाराचाही पाठिंबा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांचा संख्याबळ 56 वरून आता 64 पर्यंत वाढलं आहे. कोल्हापूर मधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची रात्री उशिरा मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी पाठिंबा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरेंना दिले.यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थिती होते.राजेंद्र पाटील यद्रावकरांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्याबळ आता 64 इतकं झालं आहे.

यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि  बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानेच आपण शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितले.त्याचबरोबर शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओला दुष्काळमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे ही  राजेंद्र पाटील यद्रावकर म्हणाले.

Web Title: Independent MLA Rajendra Yadravkar supports Shivsena

संबंधित बातम्या

Saam TV Live