VIDEO | शिवसेना आमदारांची तटबंदी! आमदार शाखाप्रमुखांच्या नजरकैदेत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

मुंबई : मुंबईत सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या गोटात जोरबैठका सुरू आहेत. तर शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलंय. या सर्व आमदारांना मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रंगशारदा हॉटेलवर ठेवण्यात आलंय. सत्ता स्थापनेसाठी पुढील २४ तास अतिशय महत्वाचे असून आपला एकही आमदार फुटू नये, यासाठी शिवसेनेने ही खबरदारी घेतलीय.

सत्तेचा पेच सुटेपर्यंत आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले असून या आमदारांवर लक्ष ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक मास्टर प्लान तयार केलाय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारावर लक्ष ठेवण्यासाठी एका आमदारामागे एक विभागप्रमुख आणि एका शाखाप्रमुखाला नेमण्यात आलंय. आमदारांना कोण कोण भेटतं, कोणाचे फोन येतात, त्यांचं काय बोलणं होतं यावर या शाखाप्रमुखांचं बारीक लक्ष असणार आहे. तसंच आमदारांच्या दिवसभरातल्या प्रत्येक हालचालीची माहिती थेट उद्धव ठाकरेंच्या कानावर घालण्यात येणार आहे.   

पाकिस्तानच्या उरात भरणार धडकी; भारत उद्या करणार 'या' न्यूक्लियर मिसाईलची चाचणी

यापुर्वी कर्नाटक, गोवा आणि अरूणाचल प्रदेशमध्ये भाजपने विरोधी पक्षासह मित्र पक्षांचे आमदारही गळाला लावत आपली सत्ता स्थापन केली होती. हा अनुभव लक्षात घेता शिवसेनेने सावध पावलं टाकायला सुरूवात केलीय.

Web Title : shivsena MLA stay at rangasharada By ordered 

संबंधित बातम्या

Saam TV Live