शिवसेना - मनसे राडा; राहुल शेवाळेंच्या पत्नीला तुरुंगवासाची शिक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 मे 2019

मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पोलिस हवालदाराला गंभीर मारहाण झाल्याप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्यासह 18 जणांना सत्र न्यायालयाने एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुर्भे येथे पैसे वाटपाच्या आरोपावरून हाणामारी झाली होती. त्या वेळी तेथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी विकास थोरबोले यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावर काहीजणांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात कामिनी आणि इतर 17 जणांवर गुन्हा दाखल केला. संबंधितांवर मारहाण आणि जमावबंदीच्या आरोपासह हत्येच्या प्रयत्नाचा आरोपही ठेवण्यात आला होता; मात्र हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह इतर काही आरोपांमधून या सर्वांची सुटका केली. तसेच, उच्च न्यायालयात याचिका करण्यासाठी न्यायालयाने तूर्तास या संशयितांना जामीन मंजूर केला आहे.

WebTitle : marathi news shivsena MNS ruckus wife of rahul shevale to go to jail

संबंधित बातम्या

Saam TV Live