VIDEO | भाजपाचं रात्रीच्या अंधारात चोरासारखं कृत्य - राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुंबई : संजय राऊत गेल्या कित्येक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेऊन भाजपाला लक्ष करत आहेत. आताच्या सर्वात मोठ्या राजकीय नाट्यानंतर सर्वच जण अवाक झाले आहेत. मात्र तरीही आघाडी आणि शिवसेना स्वत:च्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आणि शिवसेनेची बाजू मांडण्याची सर्वात मोठी जबाबदारी राऊतांवर येऊन पडली आहे. त्यातच आज त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाहूयात याचं सविस्तर विश्लेषण या पत्रकार परिषदेतून...

 

मुंबई : संजय राऊत गेल्या कित्येक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेऊन भाजपाला लक्ष करत आहेत. आताच्या सर्वात मोठ्या राजकीय नाट्यानंतर सर्वच जण अवाक झाले आहेत. मात्र तरीही आघाडी आणि शिवसेना स्वत:च्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आणि शिवसेनेची बाजू मांडण्याची सर्वात मोठी जबाबदारी राऊतांवर येऊन पडली आहे. त्यातच आज त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाहूयात याचं सविस्तर विश्लेषण या पत्रकार परिषदेतून...

 

अजित पवारांबरोबर 25 आमदार जातील, या भ्रमातून भाजप बाहेर पडला असेल असे मला वाटते. राष्ट्रवादीचे सगळे आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. 4 किंवा 5 आमदार त्यांची ताकद असतील. भाजपला मी व्यापारी मी समजत होतो. या व्यापारात ते चुकले आहेत. व्यापार प्रामाणिक केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली नसती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपापल्या पक्षात आहेत. या तिन्ही पक्षांचे 165 आमदार आमच्याकडे आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने अजित पवारांना साथीला घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 30 नोव्हेंबरला होणाऱ्या बहुमत चाचणीत भाजपला बहुमत मिळणार नाही, हे सांगण्यात येत आहे. राऊत यांनी भाजप खोटं पसरविण्यात हुशार आहेत, असे म्हटले आहे. सीबीआय, ईडी, सेबी आणि पोलिस हे भाजपचे चार प्रमुख कार्यकर्ते आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊथ म्हणाले, की शरद पवार हे लोकनेते असून, महाराष्ट्राचे नेते आङेत. त्यांचा पक्ष फोडून भाजप मोठे कार्य करणार असेल तर तो डाव त्यांच्यावर उलटणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. अजित पवारांना फोडून सरकार स्थापन करण्याचा त्यांचा शेवटचा डाव आहे. मी आगोदर 170 आमदार म्हटलो होतो, त्यातील 5 डांबून ठेवले आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याचे जनतेलाच माहिती नव्हते. असा काळा दिवस आम्ही पाहिला नव्हता. भाजपने काल राजभवनाचा काळाबाजार केला. यापूर्वी इंदिरा गांधींना लादलेल्या आणीबाणीविषयी काळा दिवस म्हणून नये, कारण त्यापेक्षा काळा दिवस काल ठरला आहे. तुम्ही लपूनछपून का शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंत का वेळ मागितली. आपले राज्यपाल भगवान आहेत, त्यांनी आम्हाला आणि त्यांना वेगवेगळा वेळ दिला. विधानसभेत महाआघाडी बहुमत सिद्ध करेल. राज्यपालांनी आम्हाला आता बोलविले तर आम्ही 10 मिनिटांत आकडा दाखवू शकतो. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी एकमेंकांना भरविलेले लाडू त्यांच्या घशाखाली उतरणार नाहीत. अजित पवार यांनी विधायकाना फसवलं आणि अजित पवारांना भाजप ने फसवलं, फसवण्याची ही मालिका आहे. अजित पवार यांनी आपल्या आयुष्यातील वाईट काम केलं आणि पवारसाहेबांच्या पाठीत या वयात खंजीर खुपसला.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut targets BJP for government formation in Maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live