VIDEO | सेनेचा काँग्रेसला मैत्रीचा हात तर भाजपावर राऊतांचा जोरदार हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत, भाजपवर हल्लाबोल केलाय. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला संधी दिली असून, इतर कोणी सत्तेचा दावा न केल्यास. आम्ही ती जबाबदारी पार पाडू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीवर स्तुतिसुमनं उधळत, चर्चेसाठी दारं खुलं असल्याचंदेखील स्पष्ट केलं.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊतांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत, भाजपवर हल्लाबोल केलाय. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला संधी दिली असून, इतर कोणी सत्तेचा दावा न केल्यास. आम्ही ती जबाबदारी पार पाडू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीवर स्तुतिसुमनं उधळत, चर्चेसाठी दारं खुलं असल्याचंदेखील स्पष्ट केलं.

भाजपचा बहुमत विकत घेण्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. भाजपने त्यांना राज्यपालांनी दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा. तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकत नाही. राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर काँग्रेसच्या भूमिकेचे राज्यातील जनता स्वागत करेल. काँग्रेस हा महाराष्ट्राचा शत्रू नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात आज भाजपची बैठक होत असताना त्यापूर्वीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्याजवळ बहुमत असेल तर त्यांनी सत्ता स्थापन करावी, असेही म्हटले आहे.

काय म्हणाले संजय राऊत...?

संजय राऊत म्हणाले, की भाजपकडे आत्मविश्वास आहे, म्हणून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. त्यांनी बहुमत सिद्ध करावे. कोणीही सत्तेचा दावा न केल्यास आम्ही जबाबदारी घेऊ. जनादेश स्वीकारण हे आमचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा आमचा राजकीय वैरी नाही. प्रत्येक राजकीय पक्षात मतभेद असतात. आमचे भाजपसोबतही मतभेद होते. राज्याच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. बेळगाव-कारवार मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार ज्या आबदीने बोलतात तसे भाजप बोलताना दिसत नाही. डील करण्यासाठी आम्ही व्यापारी नाही. आज उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे आमदारांच्या भेटीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील. राज्यात भयाची स्थिती निर्माण झाली होती. ती संपलेली आहे. आता पैशाच्या जोरावर कोणी कोणाला विकत घेऊ शकत नाही. राम मंदिराचा मुद्दा कोणत्या एका पक्षाचा नाही. देशाचा मुद्दा आहे. शिवसेनेचे मोठे योगदान यामध्ये आहे. 

 

Web Title: Shivsena MP Sanjay Raut targets BJP for Maharashtra formation


संबंधित बातम्या

Saam TV Live