संजय राऊत याचं नवं ट्विट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

संजय राऊत यांनी केलेले हे ट्विट सत्तास्थापनेसाठी तर नसेल ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सतत ते सांगत आले आहेत, शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून आपल्या ट्विटमधून सूचक इशारे देणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही (मंगळवार) ट्विट करत असेच काही केले आहे. आयुष्यात काही मिळवायचे असेल तर पद्धत बदलली पाहिजे पण लक्ष्य सोडले नाही पाहिजे, असे म्हटले आहे. 

 

संजय राऊत यांनी केलेले हे ट्विट सत्तास्थापनेसाठी तर नसेल ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सतत ते सांगत आले आहेत, शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. राऊत यांनी हिंदीमध्ये केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की अगर जिंदगी मे कुछ पाना हो, तो तरिके बदलो इरादे नाही... जय महाराष्ट्र.

दिल्लीत सोमवारी सायंकाळी शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने गोंधळ आणखी वाढला आहे. महाराष्ट्रातील पेचप्रसंगाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांची तासभर भेट चालली. मात्र, त्यांच्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. राज्यातील दुष्काळप्रश्‍नी पंतप्रधानांना भेटणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, अशी मागणी आपण केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा विश्‍वासही राऊत यांनी या वेळी व्यक्त केला होता. सध्या ते दिल्लीत आहेत.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweet about political situation
 


संबंधित बातम्या

Saam TV Live