शिवसेनेचा नारा.. एकच स्पिरीट, नो किरीट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 मार्च 2019

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणारे भाजपचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांनी "एकच स्पिरीट,नो किरीट" असा कडवा नारा दिला. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

सोमय्या यांना जाहीर विरोध करताना शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी घोषणा केली, की जर सोमय्यांना तिकीट दिले तर मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहे. राऊत यांनी म्हटले, की जर भाजपने सोमय्याऐवजी इतर कोणाला उमेदवारी दिली तर आम्ही त्याचा एकदिलाने प्रचार करून विजयी करू.

दरम्यान, सोमय्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना भेट नाकारण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजपवर या मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे.

Web Title : marathi news shivsena party workers continues their oppose for kirit somaiya 

संबंधित बातम्या

Saam TV Live