अमित शहांच्या मनसुब्यांना उद्धव ठाकरेंकडून प्रतिआव्हान..

वैदेही काणेकरसह तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई
बुधवार, 19 जून 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनाच अप्रत्यक्ष आव्हान दिलंय. भाजपसोबत युती असली तरी विधानसभेवर भगवा फडकवण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.

पुढच्या वर्षीच्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल, त्यामुळं कामाला लागा, असे आदेशच उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिलेत. भाजपनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर सावध प्रतिक्रिया घेतलीय.

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कुठल्याही परिस्थितीत भाजपचाच मुख्यमंत्री व्हायला हवा असे आदेश अमित शहांकडून भाजपच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना मिळाल्याची माहिती मिळतेय. त्यातच उद्धव ठाकरेंनी विधानसभेवर युतीचा झेंडा नव्हे तर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आदेश दिलेत.

उद्धव ठाकरे यांनी दिलेले हे आदेश म्हणजे अमित शहांच्या मनसुब्यांना उद्धव ठाकरेंकडून देण्यात आलेलं प्रतिआव्हान असल्याची खमंग चर्चा रंगलीय.

WebTitle : marathi news shivsena politics vidhansabha elections uddhav thackeray amit shah

संबंधित बातम्या

Saam TV Live