VIDEO | शिवसेना पुन्हा पेचात? सत्तेसाठी राष्ट्रवादीचा 50-50 चा फॉर्म्युला?

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सत्ता स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत..त्यातच आता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असं नवं समीकरण आकाराला येतंय.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सत्ता स्थापन करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत..त्यातच आता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना असं नवं समीकरण आकाराला येतंय.

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांनीच सूत्रं हातात घेतल्याचं दिसून येतंय..राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आणि सोबतीला शिवसेना घेणार अशी रणनीती आखली जात होती..मात्र, ज्या फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरून भाजपशी शिवसेनेचं वाजलं, तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा शिवसेनेच्या गळ्यात अडकवला जातोय, अशी चर्चा आहे..
शिवसेनेला 56 तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्यात..दोघांच्या जागांमध्ये फारसा फरक नाही..त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे अडीच अडीच वर्ष रोटेशनल पद्धतीनं राहावं, असा तोडगा राष्ट्रवादीनं सुचवल्याचं कळतं..
सरकार स्थापन करण्यास शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिल्यानंतर राष्ट्रवादीला निमंत्रण मिळालंय..तेव्हा आता नक्की काय घडतं.याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..कारण तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही,असा विचित्र जनादेश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलाय

Web Title -  SHIVSENA IS IN PROBLEM DUE TO CONGRESS AND NCP.


संबंधित बातम्या

Saam TV Live