'मातोश्री' मुख्यमंत्र्यांवर नाराज ! शिवसेना - भाजपात जुंपली

'मातोश्री' मुख्यमंत्र्यांवर नाराज ! शिवसेना - भाजपात जुंपली

सत्तास्थापनेबद्दलची सेना-भाजप यांच्यातली पहिली बैठक रद्द करण्यात आली आहे. काही वेळात ही बैठक सुरु होणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी 50-50 चा फॉर्म्युला नाकारल्यानं उद्धव ठाकरेंनी ही बैठक रद्द केलीय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. या बैठकीसाठी दोन्ही पक्षांकडून २-२ नेत्यांची बैठक होणार होती. मात्र, मुख्यमंत्री समसमान वाटपाचं सूत्र नाकारत असतील तर बैठकीला काय अर्थ असं विचारत संजय राऊत यांनी बैठक रद्द झाल्याचं जाहीर केलं. 

दरम्यान, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे, यात चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या सोबत सर्व प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. 

'अडीच-अडीच वर्ष' म्हणजे काय रे भाऊ ?
शिवसेनेसोबत अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं कोणतही वचन दिलं नव्हतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजपच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. 5 वर्ष टिकेल असं सरकार स्थापन करू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. येत्या 8 तारखे आत महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.  

WebTitle : shivsena refused to meet fadanvis and BJP after CM fadanvis says there was not any two and half years CM post sharing formula

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com