ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यानं नवस केला आणि1080 किमी चालत तिरुपतीला पोहचला....

सरकारनामा
रविवार, 19 जानेवारी 2020

बीड : राज्यात अनेक नाट्यमय घडमोडी घडल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार आल्याने बीडचे शिवसैनिक सुमंत रुईकर व श्रीधर जाधव यांनी केलेला नवस फेडण्यासाठी बीड ते तिरुपती हे 1080 किलोमिटर अंतर पायी चालून पार करुन दर्शन घेतले. 

सुमंत रुईकर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे समर्थक आहेत. मागच्या वेळी त्यांच्या पत्नी बीड नगर पालिकेच्या नगरसेविका होत्या. दरम्यान, या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री भाजप कि शिवसेना असा पेच आणि चर्चांची राळ सुरु झाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर पायी चालत तिरुपतीचे दर्शन करण्याचा नवस सुमंत रुईकर यांनी केला. 

यानंतर अनेक घडमोडी घडल्या आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. बोललेला नवस पुर्ण करण्यासाठी सुमंत रुईकर व श्रीधर जाधव यांनी ता. पाच डिसेंबर पासून बीडहून तिरुपतीची वाट धरली. रोज 35 ते 40 किलोमिटर अंतर पार करुन ता. 31 डिसेंबरला बीड ते तिरुपती हे 1080 किलोमिटर अंतर पार केले आणि तिरुपतीचे दर्शन घेतले. यानंतर सुमंत रुईकर यांनी मुंबईत परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. ठाकरेंनी वेळ देऊन रुईकर यांची विचारपूस केली. 

Web Title Shivsena supporter walk 1080 km to rich tirupati 

संबंधित बातम्या

Saam TV Live