शिवशाही बसचे वर्षभरात तब्बल 230 अपघात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या एसटीतील भाडेतत्त्वावरील व स्वत:च्या मालकीच्या शिवशाही बसचे तब्बल 230 अपघात झाले आहेत.

अपघात रोखण्यासाठी सध्या एसटी महामंडळाकडून अतोनात प्रयत्न सुरू आहेत. बसवरील कार्यरत खासगी व एसटीचालकांना पुन्हा प्रशिक्षण, तसेच भाडेतत्त्वावरील शिवशाही बस पुरवणाऱ्या कंत्राटदारांनी परतीच्या प्रवासात नवीन चालक देण्याची सूचना केली असून नियम न पाळणाऱ्या कंत्राटदारांना कारवाईचा इशारा दिला आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live