शिवशाहीच्या' दारूड्या ड्रायव्हरचा प्रताप; तर्राट अवस्थेत ८२ किलोमीटर चालवली बस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

एसटी महामंडळाची शान असलेल्या शिवशाहीचा हा तळीराम ड्रायव्हर एवढा झिंगलाय की त्याला ड्रायव्हर सीटवर बसण्याची या ड्रायव्हरनं ४४ प्रवाशांची जीवाशी खेळ केलाय. ठाण्याहून गुहागरला निघालेल्या शिवशाही बसच्या ड्रायव्हरनं पेणजवळ एका धाब्यावर दारू ढोसली.

त्यानंतर त्यानं बस भरधाव वेगानं चालवली. शेवटी महाड एसटी स्टँडवर त्याला जबरदस्तीनं थांबवण्यात आलं.

ज्यावेळी बस ड्रायव्हरला थांबवलं त्यावेळी त्याला चालण्याचीही शुद्ध नव्हती. काहीच क्षणात तो ड्रायव्हर सीटवरच झोपला. शिवशाही बसवरच्या या तळीराम कंत्राटी ड्रायव्हरमुळं एसटी आणि शिवशाही या ब्रँड नेमचही नाव धोक्यात आलंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live