उद्यापासून शिवशाहीचा प्रवास स्वस्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

असे असणार नवीन दर 
मार्ग....पूर्वीचे दर....नवीन दर 
बीड ते मुंबई....1,130.....885 
बीड ते पुणे....700....525 
बीड ते नगर....385...285 
परळी ते मुंबई....1,385...1,035 
परळी ते पुणे....955...715 
अंबाजोगाई ते मुंबई....1,320....990 

बीड - जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या चार शिवशाही स्लीपर कोच बस आहेत; मात्र त्यांचे प्रवास भाडे जास्त असल्याने त्यांना अल्प प्रतिसाद होता. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात कपात करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारपासून (ता. 13) शिवशाही स्लीपर बसचे भाडे कमी होणार आहे. शिवाय लवकरच बीड येथून कल्याण, ठाणे, बोरीवली या मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

सध्या जिल्ह्यात चार शिवशाही स्लीपर बस सुरू आहेत. यामध्ये बीड-मंबई व परळी-मुंबई या मार्गावर या बस धावत आहेत; परंतु या बसचे जास्त भाडे असल्यामुळे अनेक प्रवासी खासगी बसने प्रवास करत होते; परंतु आता एसटी महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाहीचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. 230 ते 505 रुपयांपर्यंतची भाडे कपात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना पूर्वीपेक्षा मुंबई, पुणे, नगर याठिकाणी जाण्यासाठी कमी पैसे द्यावे लागणार आहेत. नवीन दर बुधवारपासून लागू होणार असल्याची माहिती बीड एसटी आगाराचे संतोष महाजन यांनी दिली. 

असे असणार नवीन दर 
मार्ग....पूर्वीचे दर....नवीन दर 
बीड ते मुंबई....1,130.....885 
बीड ते पुणे....700....525 
बीड ते नगर....385...285 
परळी ते मुंबई....1,385...1,035 
परळी ते पुणे....955...715 
अंबाजोगाई ते मुंबई....1,320....990 

जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हा महामंडळाच्या वतीने अनेक चांगले निर्णय घेण्यात येतात. यामध्ये सध्या शिवशाही स्लीपरचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेले आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रवाशांनी एसटीच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान (स्लीपर) व बसने प्रवास करावा.
- बीड विभाग नियंत्रक श्री. सुपेकर

Web Title: marathi news shivshahi bus ticket rates dropped 


संबंधित बातम्या

Saam TV Live