अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या रचनेत होणार बदल ?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

हजारो कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकातील विघ्न काही दूर होण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. पर्यावरण प्रेमींचा विरोध, स्मारकाच्या खर्चावर आक्षेप आणि इतर नानाविध अडचणीत सापडलेल्या शिवस्मारकाला आता मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील वादाची किनार लागली आहे.

या वादाला निमित्त ठरलं आहे, ते प्रस्तावित स्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याचा आराखडा बदलण्याची चर्चा. अश्वारुढ शिवस्मारकाऐवजी समुद्रात सरदार वल्लभ पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसारखा उभा पुतळा उभारण्याच्या चर्चेंनी जोर धरला. याबाबत समितीचं पत्रकही बाहेर आल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, त्या पत्रकात काहीच तथ्य नसून, शिवरायांचा पुतळा हा अश्वारुढच असेल असं स्पष्टीकरण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी दिलंय. तसंच काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्यामुळे, वाद उभे राहत असल्याची टीकादेखील मेटेंनी केली.

गेल्या 4 वर्षांपासून केवळ घोषणा आणि भूमिपूजनात अडकलेल्या शिवस्मारकाबाबत, सरकार खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न या वादामुळे निश्चितच प्रत्येक शिवप्रेमींच्या मनात उपस्थित होत असेल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live