धक्कादायक! अंगात भूत असल्याचं सांगत 70वर्षीय आईसह 50 वर्षीय मुलाचा बळी

साम टीव्ही
रविवार, 26 जुलै 2020

 कल्याणंमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली सत्तर वर्षीय आईसह पन्नास वर्षीय मुलाचा बळी देण्यात आल्याची घटना घडलीय. खडकपाडा परिसरातील अटाळी येथे काल संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला. 

मुंबई : कल्याणंमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली सत्तर वर्षीय आईसह पन्नास वर्षीय मुलाचा बळी देण्यात आल्याची घटना घडलीय. खडकपाडा परिसरातील अटाळी येथे काल संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला. 

पाहा सविस्तर व्हिडिओ -

अंगात भूत असल्याचं सांगत अघोरी बाबासह भाऊ आणि दोन पुतण्यांनी, मायलेकांना लाकडी दांड्याने बदडले. आणि या अघोरी मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबासह, तीन नातेवाईकांना ताब्यात घेतलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live