प्रभू राम यांच्याशी संबंधित जागांचं दर्शन घडवणार 'श्री रामायण एक्स्प्रेस'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच तयारी म्हणून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी, 'श्री रामायण एक्स्प्रेस'ची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबरपासून ही ट्रेन अयोध्या ते रामेश्वरम अशी धावणार असून, भगवान श्रीराम यांचे जेथे जेथे वास्तव्य झाले त्यातील महत्वाच्या ठिकाणांची सैर या 'रामायण एक्स्प्रेसच्या' माध्यमातून घडवण्यात येणार आहे. रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणांची ही 16 दिवसांची सफर आहे. ही सहल दोन भागात आहे. पहिले भारतातील काही ठिकाणे आणि श्रीलंकेतील काही ठिकाणे.

2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच तयारी म्हणून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी, 'श्री रामायण एक्स्प्रेस'ची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबरपासून ही ट्रेन अयोध्या ते रामेश्वरम अशी धावणार असून, भगवान श्रीराम यांचे जेथे जेथे वास्तव्य झाले त्यातील महत्वाच्या ठिकाणांची सैर या 'रामायण एक्स्प्रेसच्या' माध्यमातून घडवण्यात येणार आहे. रामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ठिकाणांची ही 16 दिवसांची सफर आहे. ही सहल दोन भागात आहे. पहिले भारतातील काही ठिकाणे आणि श्रीलंकेतील काही ठिकाणे. श्रीलंकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना थोडे अधिक पैसे भरावे लागतील. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live