मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नाराज

मुख्यमंत्र्यांवर शेतकरी नाराज

श्रीगोंदे (नगर) : दीड महिन्यांपुर्वी सुटलेले आणि श्रीगोंद्याच्या वाट्याला अजूनही न आलेले कुकडीचे पाणी काल गुरुवारी सांयकाळी बंद झाले. श्रीगोंद्यातील ७५ टक्के सिंचन राहिले असतानाच कुकडीचे कार्यालय नगरला आणण्याच्या मूळ वादातून पुण्यातील काही नेत्यांनी येडगाव कालवा बंद केल्याने श्रीगोंदेकरांवर पुन्हा अन्याय झाला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शनिवारी तालुका दौऱ्यावर येत असतानाच शेतकऱ्यांची ही नाराजी झाली आहे.

कुकडीतून २९ जूलैला शेतीचे आवर्तन सुरु झाले. मात्र अजूनही पाणी कर्जत व करमाळा याभागात सुरु आहे. गेल्या काही दिवसात श्रीगोंदे तालुक्यातील वितरीका सुरु झाल्या मात्र किरकोळ स्वरुपात भरणे झाली आणि काल पाणी बंद झाले. करमाळा व कर्जतच्या नेत्यांची पाण्यावरुन वाद झाले. पुणेकरांनी खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांचा नगरला कार्यालय आणण्याचा मुद्दा लावून धरला आणि त्यातच पारनेरला एक कार्यालय आले. यात आता श्रीगोंद्याचा शेतकरी होरपळला जाणार आहे. पाऊस नाही आणि आता कुकडीचे पाणीही नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याला उभे वारे सुटणार आहे.

मध्यतंरी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखेपाटील व माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी बैठक घेवून पाण्याचे नियोजन केले होते. त्यात श्रीगोंदे तालुक्यात २ सप्टेंबरला पाणी देण्याचे ठरले. प्रत्यक्षात मात्र ही वेळ तर पाळली गेली नाहीच शिवाय आता सिंचन सुरु झाले आणि पाणी बंद झाल्याने सगळाच गोंधळ झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून अजूनही पाणी कर्जतच्या काही भागात सुरु आहे. त्यामुळे माथा व पायथ्याच्या लोकांची दादगिरी होत असताना श्रीगोंद्यातील संयमी शेतकरी भरडला गेला आहे. 

दरम्यान उद्या शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुका दौऱ्यावर येत आहेत. कुकडीचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांची नाराजी वाढू शकत असल्याने प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल.

Web Title: shrigonda farmers faces issue of water scarcity

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com