पाकची धारण पाचावर, पीओकेमधील ४० गावांचं स्थलांतर तर १२७ गावांना हाय अलर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

श्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जवळपास 40 गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत तर जवळपास 127 गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाईन ऑफ कंट्रोल (LOC) जवळील लोकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दहशतवादी मसूद अजहरला जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर मुख्यालयातून काढून बाहेर लपवण्यात आलं आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावलपिंडीमध्ये एका सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहमंदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला कायमचाच धडा शिकविण्याची मागणीनेही जोर धरला आहे.

Web Title: pakistan has evacuated 40 villages from loc

संबंधित बातम्या

Saam TV Live