जवानाचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याचं वृत्त खोटं

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 9 मार्च 2019

श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट केले आहे.

भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे अपहरण झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, अपहरण झालेल, नसून मोहम्मद यासीन सुरक्षित असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे आधीच जम्मू काश्मीरमध्ये तणाव असताना जवानाचे अपहरण झाल्याचे वृत्त चिंताजनक होते.

लाइट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेला हा जवान जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तैनात होता. घरी आलेल्या काही व्यक्ती यासीन याला सोबत घेऊन गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. यासीन हा सध्या सुटीवर असल्यामुळे तो आपल्या घरी आला होता.

Web Title: reports of abduction of a serving army soldier are incorrect defence ministry

संबंधित बातम्या

Saam TV Live