श्रीपाद छिंदम 15 दिवसांसाठी नगर जिल्ह्यातून तडीपार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 एप्रिल 2018

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला 15 दिवसांसाठी नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.' छिंदम याला नुकताच न्यायालयाने जामीन दिला. जामिनाची पूर्तता झाल्यावर आज नाशिक येथील कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तो अज्ञात स्थळी रवाना झाला होता. आता नगर पोलिस आय़ुक्तांनी त्याला 15 दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
 
छिंदम याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नाशिक येथील कारागृहात ठेवले होते. छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याचा प्रकार सोशल मीडियातून "व्हायरल' झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. त्याची तातडीने दखल घेत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी छिंदम याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतला, तसेच पक्षातूनही त्याची हकालपट्टी केली होती.

संबंधित बातम्या

Saam TV Live