पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव- श्रीरंग बारणे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निकाल 2019 : पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा नव्हे तर अजित पवार यांचा पराभव झाला आहे. मावळातील मावळ्यांनी पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया मावळचे विजयी शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. 

मतमोजणी केंद्रात 15 व्या फेरीनंतर विजय दृष्टिपथात आल्यानंतर पत्रकारांबरोबर बारणे बोलत होते. ते म्हणाले, पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही, हे मावळातील मतदारांनी दाखवून दिले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भ्रष्टाचार आणि अजित पवार यांच्या पैशाची ताकद यांचा हा पराभव आहे. पार्थ पवार हे मावळावर लादलेले उमेदवार होते. ते मतदारांना मान्य नव्हते. त्यामुळे मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबरच शेतकरी कामगार पक्षाचाही हा पराभव आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पहिल्या दिवसापासून मला सहकार्य केले त्यामुळेच मी इतके चांगले मताधिक्‍क्‍य घेऊ शकलो, असे सांगून बारणे म्हणाले, मी पाच वर्षात खासदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्‍न संसदेत उपस्थित केले. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच मला विजयाचा आत्मविश्‍वास होता. त्यातच मोदींचा झंझावातामुळे विजय आणखी सोपा झाला.

Web Title: Shrirang Barne targets Ajit Pawar after win from Maval Lok Sabha Constituency

संबंधित बातम्या

Saam TV Live