अमरावतीत होणार होती श्याम मानव यांची हत्या; एटीएसची न्यायालयात माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या श्रीकांत पांगारकरनं अमरावतीत श्याम मानव यांची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्यानं अमरावतीत रेकीही केल्याचं तपासात उघड झालंय. एटीएसनं सोमवारी न्यायालयात ही माहिती दिलीय. 

श्याम मानव हे मूळचे विदर्भातील आहेत. ते मुंबईतही वास्तव्यास असतात. पण विदर्भात ते सॉफ्ट टार्गेट ठरु शकतात, असा विचार करून पांगारकरनं अमरावतीची निवड केली होती अशी माहिती ATS ने दिलीय. पांगारकर हा प्राजी म्हणूनही सर्वांच्या परिचयाचा होता, अशी माहितीही तपासात समोर येतेय.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाचं कोडं दिवसेंदिवस उलगडत चाललंय. आशा करुयात की विचारवंतांच्या हत्येमागचे खरे सूत्रधार लवकरच गजाआड असतील.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live