हॅपी बर्थडे अमित शहा! तडीपार होण्यापासून ते गृहमंत्री बनण्यापर्यंतचा प्रवास

सिद्धेश सावंत
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

अमित शहा यांचा आज ५५वा वाढदिवस आहे. अमित शहांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. अमित शहांना राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं. भाजपने गेल्या सर्व निवडणुकांमध्ये कमावलेल्या यशामागे मोदी-शहा जोडीचा मोठा हात आहे. त्यातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून अमित शहांच्या कारकिर्दीकडे पाहणं क्रमप्राप्त आहे. 

अमित शहा यांचा आज ५५वा वाढदिवस आहे. अमित शहांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.. अमित शहांना राजकारणातला चाणक्य म्हटलं जातं. भाजपने गेल्या सर्व निवडणुकांमध्ये कमावलेल्या यशामागे मोदी-शहा जोडीचा मोठा हात आहे. त्यातला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून अमित शहांच्या कारकिर्दीकडे पाहणं क्रमप्राप्त आहे. 

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याचा प्रवास कसा होता, हे जाणून घेवूयात.

 

अमित शहांचा जन्म मुंबईत झाला. गुजरातमध्ये त्यांचं बालपण आणि आयुष्य गेलं असलं, तरी स्वप्नांच्या नगरीतच अमित शहा जन्माला आले. २२ ऑक्टोबर १९६४ साली अमित शहांचा जन्म मुंबईमध्ये झाला. एका वैभवसंपन्न वैष्णव कुटुंबात अमित शहा जन्माला आले. अमित शहांच्या जन्मानंतर त्यांचे आजोबा मुंबईहून गुजरातला शिफ्ट झाले.

 

गुजरातच्या पेतृक गावात अमित शहा यांचं बालपण गेलं. अमित शहांचं शिक्षण पारंपारिक पद्धतीने व्हावं, अशी त्यांच्या आजोबांची इच्छा होती. 

 

वयाच्या चौथ्या वर्षी अमित शहा चक्क सकाळी ४ वाजता उठायचे. सकाळी ४ वाजता उठून अमित शहा आचार्य शास्त्रींकडून परंपरागत शिक्षण घेत होते. मोठं झाल्यानंतर अमित शहा शेअर बाजारात काम करायचे. पेशाने अमित शहा स्टॉक ब्रोकर होते. अमित शहांचा राजकीय प्रवास नेमका कसा झाला आणि गृहमंत्री होईपर्यंतचा त्यांचा प्रवास काय आहे, त्यावरही एक नजर टाकुयात..

...असा आहे अमित शहांचा राजकीय प्रवास

 

१९८७ - भाजपात प्रवेश केला. युवा नेता मोर्चाचे ते सदस्य बनले.

 

१९९१ - लालकृष्ण आडवाणींच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी अमित शहांवर सोपवण्यात आली

 

१९९६ - अटल बिहारी वाजपेयींच्या प्रचाराची जबाबदारी शहांवर सोपवण्यात आली.

 

१९९७ - अमित शहांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली. सरखेजमधून अमित शहा आमदार म्हणून निवडूनही आले. 

 

१९९७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपासून, १९९८,२००२ आणि २००७मध्ये अमित शहा सातत्यानं आमदार म्हणून निवडणून येत राहिले. 

 

२००३ ते २०१४ - गुजरात राज्याच्या कॅबिनेटमध्ये गृहमंत्रीपद अमित शहांनी भूषवलं.

 

२००९ - गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी अमित शहांची निवड करण्यात आली.

 

२ जुलै, २०१० - सोहराबुद्दीन फेक एन्काऊरप्रकरणी अमित शहांना अटक करण्यात आली. मात्र पुरेसे पुरावे नसल्याकारणानं अमित शहांची सुटका करण्यात आली. त्यानंतर काही काळ अमित शहा तडीपार देखील होते, अशी माहिती मिळते. इतकंच काय, तर तडीपार असतानाही अमित शहा भाजपच्या प्रचाराता दिसले होते, अशाही काही बातम्या समोर येतात.

 

२०१३ - अमित शहांना उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी बनवण्यात आलं. अमित शहांना प्रभारी बनवल्यानंतर भाजपने घवघवीत यश उत्तर प्रदेशात मिळवलं. ज्या उत्तर प्रदेशात २०१४ आधी भाजपच्या फक्त १० जागा होत्या, तिथे अमित शहांच्या नेतृत्त्वात भाजपने तब्बल ७१ जागी कमळ फुलवलं. त्यांच्या या यशामुळे नंतर अमित शहांकडे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.

 

२०१४ - नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यामुळे यांच्या जागी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कुणाला द्यायचं हा प्रश्न होता.. अखेर गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही अमित शहांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

 

२०१९ - गांधीनगरमधून लोकसभा निवडणूक अमित शहांनी लढवली. आणि जिंकली देखील.

 

२०१९ - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमित शहांना गृहमंत्री पद 

Web Title : Siddhesh Sawant Artical On Amit Shah 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live