सापाच्या विषावर चांदीचा उतारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सर्पदंशाने मृत्यू होणं ही एक मोठी समस्या बनलीय. विशेषत: ग्रामीण भागामध्ये सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. सापाचे विष शरीरात वेगानं भिनतं आणि मेंदू, हृदय, स्नायू आणि रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करतं. त्यामुळं सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत संशोधन सुरुय, पण ठोस असा उपाय अद्याप शोधता आला नाहीय. पण आता मुंबई विद्यापीठाच्या बायोफिजिक्स विभागानं सापाच्या विषाची तीव्रता कमी करण्याबाबत संशोधन केलंय.  

चांदीच्या धातूचे सूक्ष्म कण सापाच्या विषाची तीव्रता ९५ ते ९८ टक्के कमी करतात, असा निष्कर्ष या संशोधनात काढलाय. बायोफिजिक्स विभागप्रमुख प्रा. प्रभाकर डोंगरे हे या प्रकल्पावर काम करतायत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live