सायन-पनवेल महामार्गावरील टँकरमधली गॅसगळती रोखण्यात यश; वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सायन-पनवेल महामार्गावर झालेली टँकरमधली गॅसगळती रोखण्यात यश आलंय. दरम्यान, गॅसगळतीमुळे रोखण्यात आलेली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येतेय. पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ टँकरमधून गॅसगळती झाली होती.

सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे सायन-पनवेल महामार्गावर सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता वाहतूक पूर्वपदावर येतेय.

सायन-पनवेल महामार्गावर एका टँकरला चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, धडकेमुळे टँकरमधून गॅसगळती सुरु झाली. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद केली होती.

WebTitle : marathi news sion panvel highway gas leak traffic back on track 

संबंधित बातम्या

Saam TV Live