मराठा क्रांती मोर्च्यात भाऊ-बहिणीनं घडवलं माणुसकीचं दर्शन

मराठा क्रांती मोर्च्यात भाऊ-बहिणीनं घडवलं माणुसकीचं दर्शन

मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीनं 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बऱ्याच ठिकाणी कडककडीत बंद पाळण्यात आला. तर कुठे टायर जाळले कुठं गाड्यांची तोडफोड करण्यात आली. हिंसा होऊ नये कुणाला त्रास होऊ म्हणून पोलिस मित्र झटत होते. कुठेही दंगा न होता मोर्चा सुरक्षित व्हावा याची जबाबदारी पोलिसांवर होती. पोलिस आपली जबाबदारी बजावत असताना त्यांनाही त्रास होत होता. त्यांची भावना लक्षात घेत दोन भावंडांनी आपल्या वडिलांसोबत पोलिस मित्रांना पाणी आणि बिस्कीटचं वाटप केलं. आता याच दोन भावंडांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या भावा बहिणीनं माणुसकीचं दर्शन घडवलंय. 5 वर्षाची मुलगी आणि 12 ते 13 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत पोलिसांना खाऊ देत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. आणि ही भावंडं नक्की कुठली आहेत याची सत्यता शोधा असं अनेकांनी आमच्या व्हायरल सत्य हेल्पलाईनवर सांगितलं. त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडीओची पडताळणी सुरू केली. त्यावेळी शोध घेत असताना ही भावंडं पिंपरी चिंचवडमधील असल्याचं समोर आलं.

आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी या दोन भावंडांचा शोध घेतला आणि त्यांची भेट घेतली. व्हायरल व्हिडीओत दिसणारे हेच आहेत ते दोघं, हर्षिदा कुकरेजा आणि मोहित कुकरेजा अशी या दोघा भावंडांची नावं. याच दोघांनी पोलिसांना पाणी आणि बिस्कीट देऊन माणुसकीचं दर्शन घडवलं. 9 ऑगस्टला महाराष्ट्र बंद असल्यानं शाळेला सुट्टी होती. त्यात घरी काहीच काम नसल्यानं काहीतरी वेगळं करण्याची या चिमुकल्यांचा इच्छा होती. 24 तास जनतेची सेवा करणाऱ्या पोलिस जवानांना हर्षिदा आणि मोहितनं मदत करण्याचं ठरवलं. त्यात वडिलांना इच्छा सांगितल्यानंतर वडिलांनी देखील इच्छेला दुजोरा देत बिस्कीट पॅकेट आणि पाण्याच्या बॉटल्स आपल्या बाईकवरून आणून दिल्या.

मुलांची इच्छा आई वडील पूर्ण करणार नाही तर मग कोण करणार? त्यातच अशी मदतीची प्रामाणिक इच्छा जर मुलांच्या मनात असेल तर आई वडिलांना नक्कीच गर्व वाटतो. मुलांनी चांगलं काम करावं, मोठ्यांचा आदर ठेवावा. संकटात मदतीचा हात द्यावा अशी शिकवण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना देतात. हीच इच्छा कुकरेजा परिवारातील या चिमुकल्यांनी पूर्ण केलीय.

मोर्चा असो, मोठ मोठ्या सभा असो. दिवसरात्रं डोळ्यात तेल घालून पोलिस आपल्याला सुरक्षा देत असतात. तरीदेखील काहीजण पोलिसांवर हल्ला करायला मागेपुढे पाहत नाही. त्यात पोलिसांचा काय दोष यावर विचार करणं महत्वाचं आहे. त्यातच जर चिमुकल्यांना हे कळत असेल तर आपण तरी सद्यानी आहोत. मग आपल्याला हे कधी कळणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com