मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर, रोज नवीन रुग्ण आढळत असल्यानं चिंचा वाढली...

साम टीव्ही
बुधवार, 15 एप्रिल 2020

मुंबईत दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. गजबजलेल्या अशा दादर मध्ये कोरोनाचे  2 नवे रूग्ण आढळलेत. एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आणि ऐकोणसत्तर वर्षीय ज्येष्ठ पुरुषाला कोरोनाची लागण झालीय.

मुंबईतल्या एका रुग्णालयात आणखी 10 कोरोनाच्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व दहा जण रुग्णालयातले कर्मचारीच आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील एकूण 35 जणांना कोरोनाची लागण झालीय. अशातही आणखी काही कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

मुंबईत दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. गजबजलेल्या अशा दादर मध्ये कोरोनाचे  2 नवे रूग्ण आढळलेत. एका 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेला आणि ऐकोणसत्तर वर्षीय ज्येष्ठ पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे दादरमधील कोरोना रुग्णांचा आकडा हा 21वर गेलाय. तर इकडे माहीममध्येही कोरोनाचा एक रुग्ण वाढलाय. माहिमच्या प्रकाश नगर परीसरात राहणाऱ्या एका 55 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे माहीमध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 7 झालेत. 

धारावीमध्ये एकाच दिवसात 5 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 60वर गेलाय. तर धारावीमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतील धारावी कोरोनाचं हॉटस्पॉट ठरली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live