मुंबई दिल्लीसह 6 शहरं कोरनाचे हॉटस्पॉट म्हणून घोषित

साम टीव्ही
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

कोरोनामुळे प्रभावित देशातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या मेट्रो शहरांचा समावेश आहे. तमिळनाडूतील सर्वाधिक 22 जिल्ह्यांना या यादीत ठेवले आहे.

कोरोनामुळे प्रभावित देशातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद या मेट्रो शहरांचा समावेश आहे. तमिळनाडूतील सर्वाधिक 22 जिल्ह्यांना या यादीत ठेवले आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्रप्रदेशातील प्रत्येकी 11 जिल्ह्यांसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्लीतील सर्व 9 जिल्ह्यांना हॉटस्पॉट शहरांमध्ये समावेश केला आहे. तसेच कर्नाटकातील 8 जिल्हे हॉटस्पॉटच्या श्रेणीत समाविष्ट आहेत.

दरम्यान असं असलं तरी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजारांच्या पार गेलाय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 202 इतकी झालीय. तर 300 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत राज्यात 51 हजार कोरोना टेस्ट झाल्यात. यातील  मुंबईत 24 हजार टेस्ट झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.मृत्यूदर कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही टोपेंनी सांगितलंय.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजारांच्या पार गेलाय. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार २०२ इतकी झालीय. तर ३०० रुग्ण कोरोनामुक्त झालेत.आतापर्यंत राज्यात ५१ हजार कोरोना टेस्ट झाल्यात. यातील  मुंबईत २४ हजार टेस्ट झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मृत्यूदर कमी व्हावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही टोपेंनी सांगितलंय.

Web Title - marathi news Six cities including Mumbai Delhi declared as Korana hotspots


संबंधित बातम्या

Saam TV Live