काश्मीरमध्ये कारवाईत सहा दहशतवाद्यांचा खात्मा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (शुक्रवार) पहाटे झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. आज पहाटे जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. परिसराला सुरक्षा दलांनी वेढले आणि शोधमोहीम सुरु झाली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनी केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले. अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून, त्यांची ओळख पटलेली नाही. हे अतिरेकी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असू शकतात. परिसरामध्ये परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात सुरक्षा दलाला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. 20 नोव्हेंबर रोजी शोपियाँ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सुरक्षा दलातील एक जवानही या चकमकीत हुतात्मा झाला होता. गुरुवारी (ता. 22) कुलगाम येथील सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. मात्र, जवानांनी कारवाईनंतर दहशतवादी पसार झाले होते.


संबंधित बातम्या

Saam TV Live