माजी मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; कार्यकर्त्यांनी फेकल्या अंडी, टोमॅटो आणि चपला!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

विशाखापट्टणम : तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांना गुरुवारी (ता.२७) सायंकाळी पाच तास चाललेल्या नाटकानंतर पोलिसांनी विशाखापट्टणम विमानतळावर ताब्यात घेतले. 

नायडू दोन दिवसांच्या ‘प्रजा चैतन्य यात्रे’करिता गुरुवारी सकाळी ११.४५ वाजता विमानतळावर उतरले. ते शहरातील पेंडुर्ती भागातील नागरिकांची भेट घेणार होते. या भागातील काही नागरिकांच्या जमिनीवर वायएसआर कॉँग्रेस नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा त्यांनी आरोप केला असून, याप्रकरणी ते येथील नागरिकांची भेट घेणार होते.

मात्र, ते विमानतळावर उतरल्यानंतर सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत ‘नायडू गो बॅक’च्या घोषणा दिल्या. यानंतर टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी नायडूंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने येथील वातावरण बिघडले आणि दोन गटांत

आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांच्या धोरणाला विरोध केल्याने तुम्हाला विशाखापट्टणमला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हणत वायएसआरच्या कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडूंच्या ताफ्यावर अंडी, टोमॅटो आणि पादत्राणे फेकली. या वेळी वायएसआरच्या कार्यकर्त्यांनी विशाखापट्टणममधून जाणारा कोलकाता-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग रोखत नायडूंना विशाखापट्टणमला जाण्यापासून रोखले.

या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. पाच तासांपेक्षा जास्त काळ हा गोंधळ सुरू होता. यानंतर पोलिसांनी चंद्राबाबू नायडूंना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५१ अंतर्गत ताब्यात घेत त्यांना विजयवाडाला परत पाठविण्यात आले. 

पोलिस अशाप्रकारे हजारो वायएसआरसी कार्यकर्त्यांना विमानतळावर येण्यास परवानगी कसे काय देऊ शकतात आणि तणावपूर्ण वातावरण कसे तयार करू शकतात? मी सत्तेत असताना मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी जगन यांना ‘पदयात्रा’ घेण्यास रोखले होते? हे लोक विशाखापट्टणममधील शांत वातावरणाला त्रास देत आहेत. 
- एन. चंद्रबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश 

Web Title Slipper Thrown At Andhra Pradesh Former CM Chandrababu Naidu Convoy During His Amaravati Visit

संबंधित बातम्या

Saam TV Live