पंढरीतील त्या 25 हजारांच्या चपलांची का होतेय चर्चा?

भारत नागणे
रविवार, 15 डिसेंबर 2019

नागीण चप्पल हा शब्द ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. पण खरी गंम्मत तर पुढे आहे, या चपलेची किंमत सोन्याच्या किंमती इतकी आहे. कशी आहे ही चप्पल,पाहूयात या सविस्तर विश्लेषणातून...

नागीण चप्पल हा शब्द ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील. पण खरी गंम्मत तर पुढे आहे, या चपलेची किंमत सोन्याच्या किंमती इतकी आहे. कशी आहे ही चप्पल,पाहूयात या सविस्तर विश्लेषणातून...

धिप्पाड शरिरयष्ठी, बहारदार व्यक्तीमत्व आणि झुपकेदार मिशा. हे आहेत पंढरपुरातले चांगदेव दावणे. पंढरपुरात सध्या त्यांच्याच नावाची हवा सुरुय. यामागे कारण आहे त्यांची ही नागीण चप्पल. मंडळी ही साधीसुधी चप्पल नाही. तिची बांधणी राजस्थानी थाटात करण्यात आलीय. या चपलेला सात नागफण्या आहेत म्हणून तिचं नाव नागीण चप्पल. चालताना चपलेतून आवाज यावा म्हणून दावणेंनी 100 घुंगरू देखील लावलेत. तर रात्री चप्पल उठून दिसावी म्हणून बॅटरीच्या सहाय्याने दिवे देखील लावण्यात आलेत. या चपलेचं वजन आहे 6 किलो आणि या सर्वांसाठी खर्च आलाय 25 हजार रुपये.

मंडळी इतक्या महागामोलाची चप्पल घालणारी व्यक्ती म्हणजे एखादी राजा महाराजाच असावी, पण दावणेंचं तसं अजिबात नाही. शिपाई पदावर असलेल्या दावणेंनी केवळ हौसेखातर हा सारा खटाटोप केलाय

संबंधित बातम्या

Saam TV Live