VIDEO | स्मार्टफोनमुळे तुमचं प्रचंड नुकसान! कसं? वाचा...

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

स्मार्टफोनच्या वापरानं तुम्ही आजारी पडू शकता. तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. इतकंच नाही तर तुमचं घरही उद्ध्वस्त होईल. स्मार्टफोनमुळे इतकं नुकसान का होईल, पाहूया सविस्तर विश्लेषण...

स्मार्टफोनच्या वापरानं तुम्ही आजारी पडू शकता. तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ शकतात. इतकंच नाही तर तुमचं घरही उद्ध्वस्त होईल. स्मार्टफोनमुळे इतकं नुकसान का होईल, पाहूया सविस्तर विश्लेषण...

तुम्ही स्मार्टफोन वापरत  असाल तर जरा सबुरीनं... तुम्ही स्मार्टफोनचे ऍडिक्ट तर झालेले नाहीत ना, हे तपासून पाहण्याची गरज आहे. कारण वर्षाचे तब्बल  75 दिवस म्हणजेत तब्बल अडीच महिने तुम्ही स्मार्टफोन पाहण्यात घालवता.
कुटुंबासोबत  घालवण्याचा क्वालिटी टाईम तुम्ही मोबाईलच्या निर्जीव स्क्रीनवर वाया घालवता. इतकंच नाही तर काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची तुमची कलाही लोप पावत चाललीय की काय, असा प्रश्नही तुम्हाला आत्मपरीक्षण केल्यानंतर पडेल. सायबर मीडिया रिसर्च आणि एका स्मार्टफोन उत्पादक कंपनीच्या पाहणीत ही बाब समोर आलीय.

वर्षातले जागेपणाचे 1800 तास आपण स्मार्टफोन वापरतो. म्हणजेच दिवसाचे सरासरी साडेपाच तास होतात. हे दिवसांमध्ये मोजले तर 75 दिवस होतात. भारतातल्या 75 टक्के किशोरवयीन मुलांकडे स्मार्टफोन आहे. यातल्या 41 टक्के मुलांचं शालेय शिक्षणही पूर्ण झालेलं नाही.

केवळ संपर्कासाठी असलेला स्मार्टफोन आता विविध गोष्टी करू शकतो. चॅटिंग, व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क होत असल्यानं प्रत्यक्ष भेटीगाठीही होत नाहीत. मात्र, स्मार्टफोनचं हे वाढतं वेड शारीरिक, मानसिक आजारांना निमंत्रण देऊ शकतं.

स्मार्टफोन ही बदलत्या काळाची गरज आहे. तुमची कामं झटक्यात होतात. मात्र, त्याला किती वेळ द्यायचा आणि कुटुंब, आपल्या छंदासाठी किती वेळ द्यायचा, हे प्रत्येकानं ठरवायला हवं. नाहीतर विज्ञानाचं हे वरदान शाप ठरायला वेळ लागणार नाही


संबंधित बातम्या

Saam TV Live