(VIDEO) रक्ताने भिजलेले नॅपकिन घेऊन मंदिरात जाणार का?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

मुंबई - केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्यावर केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी बोलताना ‘रक्ताने भिजलेले सॅनिटरी नॅपकिन घेऊन देवाच्या घरी, म्हणजे मंदिरात जाणे योग्य वाटते का,’ असा सवाल मंगळवारी केला.

‘‘प्रार्थनेचा हक्क सर्वांनाच आहे, मात्र पावित्र्यभंग करण्याचा अधिकार कोणाला नाही; पण हा ‘कॉमन सेन्स’ आहे. मासिक पाळी सुरू असताना तुम्ही रक्ताने भिजलेला सॅनिटरी नॅपकिन घेऊन मित्राच्या घरी जाल का? तसे तुम्ही करणार नाही. मग अशा पद्धतीने देवाच्या घरी, म्हणजे मंदिरात जाणे योग्य आहे का? हाच फरक आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे,’’ असे स्मृती इराणी म्हणाल्या.

ब्रिटिश उपायुक्तालय आणि ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने आज आयोजित ‘यंग थिंकर्स’ परिषदेत स्मृती इराणी बोलत होत्या. मंत्री असल्याने शबरीमलासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी मत व्यक्त करू शकत नाही, असे स्पष्ट करीत इराणी यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनुभव सांगितले.

संबंधित बातम्या

Saam TV Live