आयपीएल मॅच फिक्सिंग उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावर आता दिल्लीची जबाबदारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली- आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण उघड करणाऱ्या एसएन श्रीवास्तव यांच्यावर आता दिल्लीची जबाबदारी देण्यात आली आहे. श्रीवास्तव यांची दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंसाचार रोखण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका सुरु आहे. अमूल्य पटनायक यांची जागा एसएन श्रीवास्तव यांना देण्यात आली आहे. दिल्ली जळत असताना पोलिस कुठे होते? असा संतप्त सवाल अनेकजण करत आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीतील या हिंसाचारात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला.

तत्पूर्वी, एसएन श्रीवास्तव हे १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना सीआरपीएफमधून पुन्हा दिल्लीच्या पोलिस आयुक्तपदी आणण्यात आले आहे. एसएन श्रीवास्तव यांच्या कार्यकाळात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयपीएल मॅच फिक्सिंगचा खुलासा केला. तेव्हा ते, स्पेशल सेलचे विशेष पोलिस आयुक्त होते. अमूल्य पटनायक उद्या २९ फेब्रुवारीला निवृत्त होणार आहेत.

Web Title  SN Shrivastava Who Has Been Given Additional Charge As The Commissioner Of Delhi Police

संबंधित बातम्या

Saam TV Live