न्यायाधीशांना न्यायालयातच चावला साप; पनवेलमधील धक्कादायक घटना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. पी. काशीद यांना आज (मंगळवार) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास न्यायालयामध्ये साप चावल्याची घटना घडली. न्यायालयामध्ये न्यायाधीशांना साप चावल्याची घटना घडल्याने परीसरामध्ये खळबळ उडाली आहे.

न्यायाधीश सी. पी. काशीद दैनिक कामकाजाप्रमाणे आज सकाळी न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयात येऊन दालनात बसल्यानंतर काही वेळातच न्यायाधीश काशीद यांच्या हाताला साप चावला. त्यांनी साप चावल्याची माहिती वकीलांना दिली.

वकील आर. के. पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी सर्प मित्र वकील दीपक ठाकूर यांना बोलवले. वकील दीपक ठाकूर यांनी घटनास्थळावरून साप ताब्यात घेतला. तसेच हा साप बिनविषारी असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे न्यायधीशांसह न्यायालयातील वकीलांचाही जीव भांड्यात पडला. धामण जातीचा हा साप असल्याचे समजले.

संबंधित बातम्या

Saam TV Live