'बॉम्बे लॉयर्स असोसिएशन'ची ही याचिका न्यायालयाने फेटाळली.. सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहांना दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मुंबई : सोहराबुद्दीन शेख चकमकीप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. 'बॉम्बे लॉयर्स असोसिएशन'ची ही याचिका न्यायालयाने फेटाळली. याचिकाकर्त्यांकडे ठोस मुद्दा नाही, असे कारण देत उच्च न्यायानयाने ही याचिका फेटाळली.  

अमित शहा यांना सोहराबुद्दीन शेख चकमकीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने 2014 च्या डिसेंबरमध्ये या खटल्यातून दोषमुक्त केले होते. त्यानंतर या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले नव्हते. त्यामुळे सीबीआयच्या भूमिकेविरूद्ध बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सीबीआयला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावे, अशी याचिका दाखल केली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत अमित शहांना दिलासा दिला.  

दरम्यान, सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा यामध्ये सहभाग होता, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

WebTitle : marathi news sohrabuddin case amit shah mumbai high court 

संबंधित बातम्या

Saam TV Live