Loksabha 2019 : शिंदे - आंबेडकर यांच्या भेटीने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 एप्रिल 2019

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे व अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची योगायोगाने गाठ पडली. त्याचा फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आंबेडकर हे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे यांच्या समवेत आज (शनिवार) सकाळी हॉटेल सरोवर येथे नाश्ता करत होते. त्याच वेळी शिंदे माजी केंद्रीय मंत्री  शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास आले. आंबेडकर येथेच असल्याचे समजल्यावर  शिंदे यांनी त्यांची भेट घेतली व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

काही मिनिटांच्या या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही. मात्र भेटीचे छायाचित्र  मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे  "बाळासाहेब नाश्ता करताना स्वतः शिंदे त्यांना भेटायला आले होते. अचानक झालेली ही भेट आहे. भीमसैनिकांनी याचा वेगळा विचार करू नये, जय भीम..." असे स्पष्टीकरण अॅड. आंबेडकर यांच्या समर्थकांनी व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Sushilkumar Shinde and Prakash Ambedkar meets at Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live