सोलापुरातल्या सावळेश्वरमध्ये बाईकवेडे कोंबडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

दुचाकीवर थाटात बसलेले हे कोंबडे बघा. रुबाबात बसलेल्या या कोंबड्यांची नावही अशीच आहेत. सर्जा आणि राजा. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावातल्या औदुंबर लवटे यांचे हे कोंबडे सध्या सोलापूर जिल्ह्यात कुतूहुलाचा विषय बनलेयत.

कारण, लवटेंच्या या कोंबड्यांना दुचाकीचा जिव्हाळा लागलाय. सुरुवातीला गाडीवर बसवल्यानंतर घाबरणाऱ्या या कोंबड्यांना आता मात्र, गाडीशिवाय चैन पडत नाही. गाडीवर बसायची एवढी आवड लागलीय की औदुंबर लवटे गाडीला चावी लावायच्या अगोदर कोंबडेच गाडीवर बसतात.

औदुंबर लवटे हे चिंचोली एमआयडीसीत प्रीसीजन कंपनीत काम करतात. कोंबड्याप्रमाणे ससे पाळण्याचाही लवटेंना छंद होता. पण, कामाच्या व्यापामुळे फक्त कोंबड्याच पाळायला सुरुवात केली. या लाडक्या कोंबड्यांना बसण्यासाठी गाडीच्या हँडलला खास स्टँड बनवण्यात आलंय.
या स्टॅन्डवर कोंबडे अगदी आरामात आणि रुबाबात बसतात. लवटे मोहोळ बाजाराला फिरायला चालले की हे कोंबडे कायम त्यांच्यासोबत असतात. त्यामुळेच आमच्या कोंबड्यांनाही ट्रेनिंग द्या अशी मागणी लोकांकडून औदुंबर लवटेंकडे केली जातेय.

या कोंबड्यांना बाईक राईडची आगळी वेगळी आवड जडलीय. ट्रेनिंग मास्टर औदुंबर लवटे यांची मेहनत आणि कोंबड्यांवर मनापासून केलेलं प्रेम यामागचं गुपित आहे. म्हणूनचं पक्ष्यांवर प्रेम केलं तर माणूस आणि पक्ष्यांमधलं नातं किती खुलू शकत हे औदुंबर लवटे आणि त्यांच्या कोंबड्यांनी पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live