सोलापुरातील पाणी पिण्यास अयोग्य; रासायनिक खतांचा परिणाम

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 जून 2018

सोलापूर : रासायनिक खतांचा वापर आणि इतर काही कारणांमुळे जिल्ह्यातील पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे. 12 हजार 127 स्रोताच्या पाण्याचे नमुने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासले आहेत. त्यात 50 टक्के नमुने अयोग्य असल्याचे समोर आले आहे. यातून धोका निर्माण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याच्या लेखी सूचना सबंधितांना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात एक हजार 29 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये 12 हजार 127 पाण्याचे सार्वजनिक स्रोत आहेत. वर्षातून दोनवेळा त्याचे पाण्याचे नमुने तपासले जातात. ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान केलेल्या पाणी तपासणी नमुन्यात 50 टक्के नमुने अयोग्य आले आहेत. यामुळे पोटाचे विकार, किडनीच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. ग्रामीण भागात चहा फुटणे व डाळ न शिजणे असे प्रकार वाढले आहेत. तपासणीत तीन हजार 36 नमुन्यात नायट्रेडचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. याशिवाय 578 नमुन्यात क्षाराचे (टीडीएस) प्रमाण जास्त तर कठिणता असल्याचे एक हजार 394 नमुने आहेत. नायट्रेडचे प्रमाण जास्त असल्याचे नमुने जास्त आढळले असले तरी यामुळे बाधित झालेले रुग्ण जिल्ह्यात आढळत नसल्याचे सांगितले जात आहे. 

तालुकानिहाय स्रोत कंसात नायट्रेडचे प्रमाण असलेले नमुने : अक्कलकोट 778 (55), बार्शी 446 (180), करमाळा 1362 (133), माढा 1702 (521), माळशिरस 1684 (182), मंगळवेढा 1432 (562), मोहोळ 785 (262), पंढरपूर 1728 (542), सांगोला 562 (200), उत्तर सोलापूर 379 (166) व दक्षिण सोलापूर 1269 (233). 

जिल्हा परिषदेच्या उपाययोजना 
पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेने स्वच्छ पाण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. याबाबत गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पत्र पाठवली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे व नियमित शुद्धीकरण व निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. जलस्त्रोतांजवळ व जलवाहिनीजवळचा परिसर स्वच्छ ठेवून पाणीपुरवठा यंत्रणेची वेळेवर देखभाल, सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित करणे तसेच ब्लिचिंग पावडरचा तत्काळ पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live