सोलापूरात 42 जणांवर गुन्हे तर 180 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

सोलापूरात मराठा मोर्चात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणि दगडफेक प्रकरणी 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत तर 180 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलीय. 

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चांनी राज्यात उग्ररुप धारण केलंय. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांनी काल सोलापूर बंद पुकारले होते. या बंददरम्यान आंदोलकांकडून हिंसेला सुरुवात झाली.

बंददरम्यान अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला होता. शिवाजी चौकातील भागवत टॉकिज परिसरात दगडफेक झाली. दरम्यान, आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्जदेखील करण्यात आला.  

सोलापूर शहरातील अनेक व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या बंदमुळे संवेदनशिल मार्गावर एस.टी. सेवा देखील बंद ठेवण्यात आली.

WebLink : marathi news solapur maratha kranti morcha reservation agitation 

संबंधित बातम्या

Saam TV Live