सोलापुरात बंददरम्यान अनेक ठिकाणी आंदोलकांची दगडफेक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चांनी राज्यात उग्ररुप धारण केले आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांनी आज सोलापूर बंद पुकारले आहे. या बंददरम्यान आंदोलकांकडून हिंसेला सुरुवात झाली असून. बंददरम्यान अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केल्याने, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे.

शिवाजी चौकातील भागवत टॉकिज परिसरात दगडफेक झाली आहे.  सोलापूर शहरातील अनेक व्यापारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांनी मराठा आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मराठा आरक्षणाच्या बंदमुळे संवेदनशिल मार्गावर एस.टी. सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

दरम्यान सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. नवी पेठेतून मराठा आंदोलकांनाघेण्यात आलंय. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून घेतलं या आंदोलकांना ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live