Loksabha 2019 : सोलापुरातून शिंदे, आंबेडकर, महास्वामी आज दाखल करणार अर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 मार्च 2019

सोलापूर : भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर आज (सोमवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तिन्ही उमेदवार एकाच दिवशी अर्ज दाखल करणार असल्याने दिवसभर सोलापुरात राजकीय वातावरण तापणार आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुती व मित्रपक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज (सोमवार) सकाळी ११ वाजता हेरिटेज गार्डनमध्ये होणार आहे. या मेळाव्यानंतर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचा अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ८.३० वाजता चार हुतात्मा पुतळा येथून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. काँग्रेसभवन येथे पदयात्रा आल्यानंतर तेथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जाणार आहेत. वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. आंबेडकर उद्या सकाळी सम्राट चौकातील डॉ. आंबेडकर उद्यान येथून पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बसपच्या वतीनेही उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 

माढ्याची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्‍यता
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे कोण? हा प्रश्‍न अद्याप प्रलंबित आहे. माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. निंबाळकर यांचा उद्या भाजप प्रवेश असून या प्रवेशातच माढ्याची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Prakash Ambedkar Sushilkumar Shinde and Mahaswami file nomination in Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live