Loksabha 2019 : सुशीलकुमार शिंदे यांना विजयी करणे आवश्यक आहे - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 एप्रिल 2019

सोलापूर : "लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना कोणत्याही स्थितीत विजयी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा सोलापूरच्या विकासासह सर्व पातळ्यावरील परिणाम भोगावे लागतील'', असा इशारा ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. 

शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर शिंदे, आमदार भारत भालके, आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, माजी आमदार दिलीप माने, विश्‍वनाथ चाकोते, प्रकाश वाले, मनोहर सपाटे उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अपघाताने सत्ता मिळाली. साडेचार वर्षात त्यांनी देश कुठं नेऊन ठेवलाय हे आपल्यासमोरच आहे. गेल्या वेळेस सोलापुरातील जनतेनी चूक केली. मी लोकसभेत सोलापुरातून कोण आले हे उत्सुकतेने पाहत होतो आणि धक्का बसला. यंदा "त्या' उमेदवाराला बदलण्यात आले त्याचे कारण मला माहित नाही, मात्र गेल्या साडेचार वर्षात त्या खासदाराने काहीच काम केले नाही, त्याचे हे द्योतक आहे. आता जो उमेदवार आहे त्याला प्रशासकीय कामाची कोणतीच माहिती नाही. त्यामुळे सोलापुरातील जनतेने यावेळेस विचारपूर्वक निर्णय घ्यावा. संसदेत आपले खणखणीत नाणं वाजले पाहिजे आणि शिंदे हे अस्सल खणखणीत नाण आहे, याचा विचार मतदारांनी करावा.'' 

आता शेवटच्या निवडणुकीतही पवार यांचा आशिर्वाद हवा आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, "नोकरीत असताना पवार यांनीच मला राजकारणात आणले. मी अनेक निवडणुका लढविल्या. प्रत्येक निवडणुकीत ते पाठिशी राहिले. आता शेवटच्या निवडणुकीतही मला त्यांचा आशिर्वाद हवा आहे.'' यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने पवार आणि शिंदे यांचा सत्कार केला.

Web Title: Sharad Pawar warns about the consequences of loosing SushilKumar Sinde in Solapur

संबंधित बातम्या

Saam TV Live